Tractor Anudan Yojana ट्रॅक्टर साठी बचत गटांना 90 टक्के अनुदान मिळणार
ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळणार आहे.आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टरचा उपयोग शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यात मर्यादा येते.त्यामुळे “मिनी ट्रॅक्टर योजना” ही एक योजना असून या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल याची सुद्धा माहिती जाणून घेऊ.
अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटाचे आर्थिक उत्पन्न वाढवे या उद्देशाने बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने 90% अनुदानावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पात्र बचत गटांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय मध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
ट्रॅक्टर अनुदान योजना 90 टक्के अनुदान
स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांना आर्थिक स्त्रोत उपलब्ध होऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदान योजना मर्यादा 3.50 लाख एवढी असून 90% म्हणजे अनुदानाचे रक्कम 3.15 लाख एवढी आहे
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार
अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना योजनेचा लाभ मिळेल यातील अध्यक्ष व सचिव असा हा 80% सदस्य या गटातील असावे.9 ते 18 अश्वशक्ती जमिनी ट्रॅक्टर व त्याचे साधने मिळणार आहेत जास्त अशवंशक्ती ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर वरील रक्कम बचत गटांना भरावे लागेल.
आवश्यक कागदपत्रे
1गट नोंदणी छायांकित 2 बचत गटाचे बँक पासबुक 3 जातीचा दाखला 4 आधार कार्ड 5 रेशन कार्ड 6 सदस्यांचा पूर्ण फोटो 7 हमीपत्र वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागतील.