Magel Tyala Shettale Anudan मागेल त्याला शेततळे अनुदानात 25 हजारांनी वाढ

शेतकरी Magel Tyala Shettale Anudan मित्रांनो मागेल त्याला शेततळे ही योजना बंद झाली होती. मात्र आता ही योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे यातील विशेष बाब म्हणजे योजनेच्या स्वरूपात आणि नावात मोठा बदल पाहायला मिळत आहे

Magel Tyala Shettale Anudan

मागेल त्याला शेततळे योजना मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजना या नव्याने सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमार्फत आता अनुदानात सुद्धा वाढ करण्यात आले आहे आधीच्या तुलनेत 25000 ची वाढ या अनुदानात करण्यात आलेली असून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणता 13500 शेततळे बनवण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

गेल्या काळामध्ये सिंचनापासून अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत दरम्यान आता नवीन सुरुवात नवीन रंगात हे अनुदानाची योजना सुरू झाली असून संपूर्ण राज्यामध्ये 13500 या योजनेच्या माध्यमातून तयार केले जाणार आहेत पूर्वी मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी 50 हजाराचा अनुदान शेतकऱ्यांना मिळत होता मात्र यामध्ये वाढ करण्यात आली असून आता 75 हजार रुपयांचा अनुदान शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे. हे अनुदान आयुक्तालय स्तरावरून संबंधित शेतकऱ्यांच्या खातात दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कृषी योजना हे 2022 मध्ये सुरू झाली आहे परंतु त्यावेळी योजनेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी झाल्या नव्हत्या मात्र योजनेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी झाले आहेत त्यामुळे या योजनेला गती मिळणार आहे या योजनेसाठी शेतकरी मित्रांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt portal करू शकतात आणि पात्र शेतकऱ्यांना या शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात या वैयक्तिक शेततळे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 60 गुंठे शेत जमीन असणे आवश्यक आहे तसेच यापूर्वी शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नसावा दिव्यांग शेतकऱ्यांना तसेच महिला शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

इतर शेतकरी योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा