Search Report of Land जागेचा सर्च रिपोर्ट आता आपल्याला एका क्लिकवर मिळणार आहे भूमी अभिलेख विभागाची प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली आहे.
खरेदी करत असलेल्या जागेची माहिती मिळणे सुद्धा आता सुलभ होणार आहे तसेच कर्ज मिळवणे सुद्धा अधिक सोपे होणार आहे तुम्हाला एखादि जागा अथवा घर घेणार आहात आणि त्यासाठी कर्ज काढणार आहात तर बँक प्रथमता संबंधित जागेचा सर्च रिपोर्ट Bhumi Search Report मागत असते काही वेळा बँक हाच सर्च रिपोर्ट तयार करून घेते आणि त्याचे चार्जेस संबंधित ग्राहकाकडून घेत असते सर्च रिपोर्ट न केल्याने खरेदी विक्रीत फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आल्याने ही प्रक्रिया महत्वाची मानले जात होती आता ती अधिक सुलभाने परवडणारी होणार आहे. सर्च रिपोर्ट Search Report of Land काढण्यात वकील हा मुख्य दुवा असतो त्याच्या रिपोर्टमध्ये ही काही वेळा फसवण होण्याची शक्यता असते त्यामुळे आता राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने एक मोठा दिलासा देत तुम्ही असा सर्च रिपोर्ट केवळ एका क्लिकवर 0 मिनिटात मोफत मिळवू शकाल. त्यातून एका जागेवर घरावर न्यायालयात एखादा खटला प्रलंबित आहे का हे सर्च करू शकणार आहे या सुविधेचा सुविधेचा सामान्यांना मोठा फायदा होऊन त्याचे फसवणूक होणार नाही
राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने महाभूमी अभिलेख या संकेत स्थळावर सुविधा उपलब्ध करून दिले आह त्यानुसार एखाद्या नगर भूमापन अर्थात सिटी सर्वे क्रमांकावर न्यायालयात एखादा खटला सुरू आहे का हे कळणार आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर राज्यातील पुणे ठाणे औरंगाबाद या शहरात याची कामे हाती करण्यात आली आहेत न्यायालयीन खटल्याचा क्रमांक टाकल्यास हा खटला कोणत्या न्यायालयामध्ये आहे सध्याचे काय स्थिती आहे शेवटच्या सुनावणी ची तारीख काय आहे हे माहिती पडते मात्र त्यासाठी न्यायालयाकडून सर्वे क्रमांकावर असा खटला सुरू आहे हे माहिती टाकलेली असावी. त्यानंतरच ती उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे लॉन्चिंग होणार आहे.