Farmer Government Scheme शेतकरी मित्रांनो आता आपल्याला केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ मिळणार आहे. टीबीटी मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही.
भरलेला अर्ज शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनांचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढवणे,सिंचन वाााढढवे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सिंचनाखालील क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना लाभल्या जातात. अर्जदार शेतकऱ्याला योजनांचा लाभ व्हावा.
कृषी विभागाच्या योजना Farmer Government Scheme
1 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना– यामध्ये अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन बोअरवेअर दुरुस्ती अवजारे इत्यादीचा समावेश होतो.
2 राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन– यामध्ये कोल्ड स्टोरेज सामूहिक शेततळे प्राथमिक प्रक्रिया केंद्र शेडनेट यांचा समावेश होतो.
3 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना -यामध्ये शेततळे ठिबक सिंचन तुषार सिंचन.
4 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -यामध्ये बी बियाणे पावर टेलर मडणी यंत्र रोटावेटर पंप पाईप इत्यादीचा समावेश होतो.
5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना- अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी विहिरी,पाईपलाईन विहीरर दुरुस्ती अवजारे
6 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना -यामध्ये 50% अनुदान नर्सरीसाठी शेडनेट पॉलीटनिल प्लास्टिक करेट
7 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यामध्ये दोन हेक्टर पर्यंत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जात
8 राष्ट्रीय कृषि विकास योजना –यामध्ये शेततळे अस्तरीकरण शेडनेट पॉलिहाऊस कांदा चाळ याचा समावेश होतो .
9 राष्ट्रीय कृषी योजना यामध्ये कृषी यांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टर अवजारे
10 राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना -यामध्ये ट्रॅक्टर एक लाख व सव्वा लाख अनुदान आजारांसाठी 40% पर्यंत अनुदान दिले जाते
आता शेतकऱ्यांना एका अर्जावरच 14 योजनांचा लाभ मिळू शकतो यासाठी प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्याला स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्याची निवड त्यांनी अर्ज भरताना करावी.