Mahatma Jyotirao Fule Shetkari Karjmukti Yojana शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटींचा निधी मंजूर

Mahatma Jyotirao Fule Shetkari Karjmukti Yojana शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे शासनाने नुकतीच घोषणा केली आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मागील महा विकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती आता शिंदे फडणवीस सरकारने सुद्धा मोठी घोषणा केली आहे. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दरम्यान राज्यात कोरोना आणि सत्तांतर यामुळे हा निर्णय गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झाला नाही. नव्याने सत्यात आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने गेल्या सरकारचा हा निर्णय अबाधित ठेवत त्या निर्णयाच्या आंबलबजावणी सुरू केली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत Mahatma Jyotirao Fule Shetkari Karjmukti Yojana मागील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली आणि याच योजनेअंतर्गत नियमित कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यासाठी शासनाने तब्बल आता 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 50 हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर तब्बल 4700 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे या 4700 कोटी रुपयांपैकी 2350 कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांना 16 सप्टेंबर 2022 पर्यंत मिळाले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना 18 ऑक्टोबर 2022 रोजी 650 कोटी वितरित केल्याची माहिती रिपोर्ट मधून समोर आली आहे आता राज्य शासनाने 700 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी केली आहे.Mahatma Jyotirao Fule Shetkari Karjmukti Yojana

फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार क्लिक करून बघा

See also  Ration Scheme धान्याऐवजी मिळणार वर्षाला 36 हजार रुपये या जिल्ह्यांचा समावेश

Leave a Comment